अहमदनगर : रांजणी-माथणीत बिबट्याचा धुमाकूळ
Updated On:

आठ शेळ्यांवर मारला ताव; गायीवरील हल्ला शेतकऱ्याचे परतावला
नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
नगर तालुक्यातील रांजणी व माथणी परिसरात सात ते आठ दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. मागील काही दिवसांत या बिबट्याने तब्बल आठ शेळ्यांवर ताव मारला. आज सकाळी अकराच्या सुमारास या बिबट्याने शेतकरी हरिभाऊ थोरात यांच्या गायीवर हल्ला चढविला.
त्यावेळी थोरात यांनी अत्यंत धाडसाने बिबट्यावर दगडांचा मारा केला. त्यामुळे गायीला सोडून देत बिबट्या पसार झाला.दरम्यान, दिनकर थोरात यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी दुपारी गावात पोचले. त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.





