अहमदनगर । विठ्ठलवाडी येथे दोन गटांत हाणामारी परस्पर विरोधी गुन्हे दाखल

सोनई – नेवासा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे दोन गटांत हाणामारी झाल्याने सोनई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दि. ४ जुलै रोजी फिर्यादी विष्णू जगन्नाथ शिरसाठ (रा. विठ्ठलवाडी) हे शेतीच्या कामासाठी रस्त्याने जात असताना अर्जुन ठकाजी पालवे याने उसने दिलेले पैसे मागितल्याने शिरसाठ याने नंतर देतो असे म्हणाला.
या कारणावरून फिर्यादी व त्याचा पुतण्या बंडु आसाराम शिरसाठ यांना अर्जुन ठकाजी पालवे, संतोष अर्जुन पालवे, वंदना संतोष पालवे यांनी लोखंडी पाईप असलेले बैलगाडीच्या शिवळाने मारहाण करण्यात आली. दाखल फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद अर्जुन ठकाजी पालवे (वय ६० रा. विठ्ठलवाडी) यांनी दिली. त्यामध्ये बंडु आसाराम शिरसाठ, भारत आसाराम शिरसाठ, बामाबाई आसाराम शिरसाठ, विष्णू जगन्नाथ शिरसाठ, गोविंद विष्णू शिरसाठ, मदन विष्णू शिरसाठ यांनी घरी येऊन शिवीगाळ करत लोखंडी राॅड व कुऱ्हाडीने मारहाण केली. महिलेच्या गळ्यातील सोने बळजबरीने तोडून नेले. दाखल फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार के. बी. राख हे करत आहेत.





