नगर- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मिरी (ता. पाथर्डी) येथील शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी 221 ग्रामस्थांची तपासणी केली. शिबिरातील 29 गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा कांदा व्यापारी आदिनाथ वनारसे यांच्या हस्ते झाले. हभप गिरीधारी डहाळे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सूत्रसंचालन ॲड. स्नेहा शिवाजी वेताळ यांनी केले. अनिता वेताळ यांनी आभार मानले.