अहमदनगर । पाथर्डी शहराध्यक्षपदी देवा पवार; आतिष निऱ्हाळी उपशहराध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाची कार्यकारणी जाहीर

पाथर्डी – शहर युवक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी देवा पवार तर उप शहराध्यक्ष म्हणून आतिष निऱ्हाळी यांची नुकतीच निवड करण्यात आली. विस्तारित कार्यकारिणी सभेचे आयोजन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव अँड.प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, योगेश रासने, गहिनीनाथ शिरसाट उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यातील विस्तारित कार्यकारणी जाहीर झाली. नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे:- देवा पवार ( युवक शहराध्यक्ष), आतिष निऱ्हाळी (उपशहराध्यक्ष), महेश दौंड , गोविंद गर्जे (शहर सचिव), राहुल तुपे (शहर सह सचिव), धनराज घोडके (शहर सरचिटणीस), महादेव धस (चिटणीस), सिद्धीकी मणियार (संघटक), शोएब शेख (सहसंघटक),अविनाश पागारे (सोशल मीडिया शहराध्यक्ष), अल्ताफ शेख (सोशल मीडिया उपशहराध्यक्ष), मुक्कद्दर पठाण (सोशल मीडिया समन्वयक),आवेज आतार (सोशल मीडिया सहसमन्वयक),संतोष शिरसाट (सोशल मीडिया उपसमन्वयक)अशी कार्यकारणी प्रसिद्ध करण्यात आली आहे . यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार, अँड. प्रताप ढाकणे यांच्या विचारांनुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष बळकटी करून पक्ष वाढीचे काम करू. त्याबरोबर नवनिर्वाचित कार्यकारणी भरीव कार्य करेल असा मला विश्वास आहे.
-देवा पवार , शहराध्यक्ष
अँड.प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित सदस्य येणाऱ्या काळात जोमाने कार्य करतील. पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य युवकांपर्यंत पोहोचू. युवकांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढा देऊ.
आतिष निऱ्हाळी, उपशहराध्यक्ष





