अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात लक्षवेधी मांडणार : आ. कानडेंचे आश्वासन
Updated On:

श्रीरामपूर – अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करावा, असे निवेदन जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने आमदार लहू कानडे यांना देण्यात आले. त्यांनी या मुद्यावर लक्ष्यवेधी सूचना मांडू, असे आश्वासन अंगणवाडी सेविकांना दिले.
युनियनचे सरचिटणीस राजेंद्र बावके व सहचिटणीस जीवन सुरुडे अंगणवाडी सेविकांसह आमदार कानडे यांची श्रीरामपूर कार्यालयात भेट घेतली. यावेळी मागण्यांचे निवेदन आ. कानडे यांना देण्यात आले. त्यांनी या मुद्यावर लक्ष्यवेधी सूचना मांडू, असे आश्वासन यावेळी अंगणवाडी सेविकांना दिले. यावेळी बावके , सुरुडे, रतनताई गोरे यांची भाषणे झाली. आभार इंदूबाई दुशिंग यांनी मानले.





