पारनेर – आ. लंके यांच्या हस्ते आज विकासकामांचे भूमिपूजन

पारनेर -तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथे उद्या (रविवार) सायंकाळी 6 वाजता आ. नीलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड यांनी दिली.
विकासकामांत रांजणगाव मशीद ते भोयरे गांगर्डा, भोयरे गांगर्डा ते पळवे बुद्रुक आणि घोसपुरी ते रांजणगाव मशीद रस्ता सुधारणा करणे आदी कामांचे भूमिपूजन आ. नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रांजणगाव मशीद व भोयरे गांगर्डा येथील कार्यक्रमाला बाजार समिती सभापती, उपसभापती व संचालक मंडळ, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, नीलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा परिषद गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





