अहमदनगर । माणकेश्वरकडून सभासदांच्या खात्यावर ४० लाख रुपये वर्ग

अकोले – माणकेश्वर सहकारी दूध उत्पादक संस्थेकडून दिपावलीनिमित्त संघाचे रिबेट १ रुपया, संस्था रिबेट १ व ३ रुपये अनामत असे ५ रुपयांप्रमाणे उत्पादक सभासदांच्या खात्यावर ४० लाख रुपये वर्ग करून सभासदांची दिवाळी गोड करण्यात असल्याची माहिती संस्थेचे सचिव दीपक शेळके यांनी दिली.
धांदरफळ बु.येथील माणिकेश्वर दूध संस्थेचे संस्थापक ॲड. अनिलराव कासार यांचे नेतृत्वाखाली संघाचे उल्लेखनीय कामकाज सुरू आहे. दूध उत्पादक व सभासद बांधव यांचेकरिता संचालक मंडळाने गेल्या दहा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून जागृतपणे काम करत खर्चाची बचत केली. अतिशय अडचणीत असतानाही रिबेट व अनामतचा क्रांतिकारक व गौरवशाली निर्णय घेतला आहे.
दरवर्षी संस्था उत्पादक व सभासदांची दिवाळी गोड करत असून, यावर्षीही संस्थेने दिपावलीसाठी संघाचे रिबेट १ रु, संस्थेचे रिबेट १ रु व अनामत ३ रूपये अशी एकूण ५ रुपयांप्रमाणे सभासदांच्या खात्यावर जवळपास ४० लाख रुपये संस्थेने दि. २८ आॅक्टोबर रोजी वर्ग केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सुदाम वलवे, व्हाईस चेअरमन अमोल कोल्हे यांचेवतीने सचिव दीपक शेळके यांनी दिली.





