IMA च्या आवाहनानंतर टाटा ग्रुप सरसावले ; मेडिकल कॉलेजच्या पीडित विद्यार्थ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Ahmedabad plane crash। एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. १२ जून रोजी झालेल्या या भीषण अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केवळ विमानातील प्रवासीच नव्हते तर जिथे विमान कोसळले त्याठिकाणची रहिवासी देखील होते. अहमदाबादमधील या अपघातात बीजे मेडिकल कॉलेजचे अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी काही जखमी झाले तर काहींना आपला जीवही गमवावा लागला. या दुःखद घटनेनंतर आता या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदतीची मागणी होत आहे.
आयएमएने टाटा ग्रुपला मदतीचे आवाहन केले आहे. Ahmedabad plane crash।
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या गुजरात राज्य शाखेने शनिवारी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहून बीजे मेडिकल कॉलेजच्या बाधित विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आणि मानवतावादी मदतीचे आवाहन केले आहे. आयएमएने आपल्या पत्रात, “या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या किंवा जीव गमावलेल्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि आवश्यक ती मदत करावी अशी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो.” अशी मागणी करण्यात आली होती. तसेच या पत्रात,”एअर इंडियाने त्यांच्या प्रवाशांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, अशा परिस्थितीत वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठीही अशीच सहानुभूती आणि सहकार्य वाढवावे. “हे विद्यार्थी केवळ बळी नव्हते तर भविष्यातील डॉक्टर होते, त्यांच्या कुटुंबियांनाही मदतीची आवश्यकता आहे.” असे आवाहन आयएमएफकडून करण्यात आले होते.
टाटा ग्रुपने केली मदत जाहीर Ahmedabad plane crash।
एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, आयएमएच्या आवाहनानंतर काही तासांतच, एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी एका व्हिडिओ संदेशात घोषणा केली की, टाटा ग्रुप अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची मदत देईल. तसेच, जखमी झालेल्यांचा सर्व वैद्यकीय खर्च टाटा समूह उचलेल. ते भावुक झाले आणि म्हणाले, “या न भरून निघणाऱ्या नुकसानाने आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि आम्ही पीडितांप्रती संवेदना व्यक्त करतो.”
टाटा समूहाच्या तत्परतेचे कौतुक
आयएमए आणि वैद्यकीय समुदायाने टाटा समूहाच्या संवेदनशीलतेचे, जलद प्रतिसादाचे आणि जबाबदार वृत्तीचे उघडपणे कौतुक केले आहे. कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, त्यांनी स्वतः घटनेच्या ठिकाणी भेट दिली आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांना भेटले आहे. एअर इंडिया चौकशीत पूर्ण सहकार्य करेल आणि पीडित कुटुंबांसोबत दीर्घकाळ संपर्कात राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हेही वाचा
देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ; पंजाब सरकारदेखील अलर्टमोडवर, नागरिकांना मास्क घालण्याचा सल्ला





