पंतप्रधान नरेंद्र मोदींची विमान अपघातस्थळाला भेट ; परिस्थितीचा घेतला आढावा

Ahmedabad Plane Crash। गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या एका भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला. अहमदाबादहून लंडनमधील गॅटविक विमानतळावर निघालेले एअर इंडियाचे विमान AI171 हे उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात कोसळले. या अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ८:३० वाजता अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. त्यानंतर, सकाळी ९ वाजताच्या सुमारास पंतप्रधानांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पंतप्रधानांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली. त्यासोबतच ते मजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेणार आहेत. या विमान अपघातात विजय रुपानी यांचे देखील निधन झाल्याचे समोर आले आहे. Ahmedabad Plane Crash।
#WATCH | PM Modi visits Ahmedabad Civil Hospital to meet those injured in AI-171 plane crash pic.twitter.com/ebUFXSTT8o
— ANI (@ANI) June 13, 2025
या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवणे हे एक आव्हान आहे आणि त्यासाठी डीएनए नमुने घेतले जात आहेत. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २६५ मृतदेह ठेवण्यात आले आहेत. विमान अपघाताची चौकशी दोन पातळ्यांवर सुरू झाली आहे, ज्यामध्ये एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची उच्चस्तरीय समिती यांचा समावेश आहे. ब्लॅक बॉक्समुळे अपघाताचे कारण उघड होण्याची अपेक्षा आहे.
काल संध्याकाळी उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी विमानात १.२५ लाख लिटर इंधन होते. स्फोट इतका जोरदार होता की कोणालाही वाचवण्याची शक्यता नव्हती. सर्वांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. डीएनए नमुने घेण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण केली जाईल. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील. अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्य आता पूर्ण झाले आहे. हे विमान लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच ते कोसळले. Ahmedabad Plane Crash।





