नवी दिल्ली – ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्या प्रकरणी चार्जशीट दाखल झाली असून या मध्ये काँग्रेस नेते अहमद पटेल आणि गांधी कुटुंबियांवर लाच घेतल्याचा गंभीर आरोप आज नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आरोपावर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी प्रतिक्रिया दिली असून, नरेंद्र मोदी हे गटार लेव्हलची राजनीती करत असल्याचे म्हंटले आहे. तसेच चोरांना फक्त सगळीकडे चोरच दिसत असल्याचा टोला देखील त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.
#WATCH: Ahmed Patel reacts on PM's remark 'Issi chargesheet mein kaha gaya hai 'AP' ka matlab hai 'Ahmed Patel'… Says "Narendra Modi ko sab jante hain, gutter level politics karte hain. Jaise village mukhiya bol raha ho, jaise dehat mein koi municipality politics kar raha ho.." pic.twitter.com/NrhvpOSxD1
— ANI (@ANI) April 5, 2019
न्यायपालिकेवर पूर्ण भरोसा असल्याचे सांगत, दोषी असल्यास शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे अहमद पटेल म्हणाले. नरेंद्र मोदी हे स्थानिक पातळीचे राजकारण करत असल्याची टीका अहमद पटेल यांनी केली आहे.
देहरादून येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टर घोटाळ्याचा उल्लेख करत अहमद पटेल आणि गांधी कुटुंबियांवर लाच घेतल्याचा गंभीर आरोप यावेळी केला होता. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्या प्रकरणी दाखल केलेल्या चार्जशीट अनुसार, मिशेल ख्रिस्तियन आणि दुसऱ्या दलालांनी ज्यांना लाच दिली त्यांपैकी एक AP आणि दुसरा FAM असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हंटले होते. AP चा अर्थ अहमद पटेल आणि FAM चा अर्थ गांधी फॅमिली असल्याचा उल्लेख मोदींनी सभेत केला होता.