अहमदनगर | माहेरून सोने आणण्यासाठी महिलेचा छळ
Updated On:

नगर – माहेरून सोने आणावे यासाठी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित महिलेने तक्रार दिली असून आकीब अली उरमान शेख, अनिसा अली शेख, अली उसमान शेख, दिलशाह सादिक शेख, सादिक उसमान शेख, मिजबा सलमान सय्यद (सर्व रा. मुकुंदनगर) यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीत म्हटले आहे की, वरील आरोपींनी माहेरुन पाच तोळे सोने, बुलेट दुचाकी आणावी यासाठी मानसिक व शारीरिक त्रास दिला. यातील एका आरोपीने वारंवार अनैसर्गीक संभोग करुन त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.





