फक्राबाद येथील घटना ही केवळ अफवा – डॉ युवराज खराडे

जामखेड : तालुक्यातील फक्राबाद येथील एक कोरोना चा रुग्ण आढळुन आला अशी अफवा पसरली होती. मात्र ती केवळ अफवाच आसुन नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ती व्यक्ती रुग्ण नसुन त्याची तब्येत ठणठणीत आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य केले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे एक व्यक्ती परदेशातुन आपल्या गावी आला होता. मात्र त्या व्यक्तीला कोरोना झाला आसल्याची अफवा तालुक्यात पसरली मात्र ती व्यक्ती सध्या ठणठणीत आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने जामखेड तालुक्यातील व्यापाऱ्यांनी स्वतः दुकाने बंद केली आहेत. दुकाने बंद होण्याचा व फक्राबाद येथील व्यक्तीचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
तसेच फक्राबाद येथील व्यक्ती ही परदेशातुन आली आसल्याने काल मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार त्या व्यक्तीच्या हातावर स्वॅब घेण्यासाठी अहमदनगर येथे घेऊन जायचे होते. मात्र १०८ ही रुग्णवाहिका लवकर आली नाही त्यामुळे जामखेड ग्रामीण रुग्णालयातुन त्या व्यक्तीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास उशिर झाला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. सध्या या व्यक्ती तातडीने गुरुवार दि १९ रोजी सायंकाळी नगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत.
फक्राबाद येथील व्यक्ती सध्या ठणठणीत आहे. तसेच कोरोना व्हायरस टाळण्यासाठी एकच उपाय म्हणजे पुढील पंधरा दिवस गरज नसेल तर घराबाहेर पडु नये, सोशल मिडीयावर कोरोना संबंधित विश्वास ठेऊ नये, घरी गेल्यावर साबनाने स्वच्छ हात धुवा, घराबाहेर पडायचे असेल तर तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडा, तसेच सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच परदेशातुन एखादी व्यक्ती आपल्या गावात आली तर तशी माहिती आपण प्रशासनाला देऊन सहकार्य असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले .





