Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठका घेत आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षात सारं काही आलबेल असल्याचे दिसून येत आहेत.
महत्त्वाचे पद, जबाबदारी आणि कार्यक्रमांमधून डावलले जात असलेल्या असंतुष्टांनी सिव्हिल लाइन्स परिसरात बुधवारी गुप्त बैठक घेऊन असंतोषाला वाट मोकळी करून दिली.
या गुप्त बैठकीस सुमारे 12 पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध कैफियत मांडणार आहेत.