नगरमधूनही कोरोना संशयिताचे पलायन
Updated On:

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोना संशायित रुग्णाने जिल्हा रूग्णालयातुन पलायन केले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ मार्च रोजी सदरील रुग्णाला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालय प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रुग्ण निघून गेले. या बाबत जिल्हा शासकीय रुग्णालयाने पोलिसात फिर्याद दिली आहे.





