Ahaan panday: ‘सैयारा’ चित्रपटानंतर अभिनेता अहान पांडे आणि त्याची को-स्टार अनीत पड्डा यांच्या डेटिंगच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहत्यांमध्येही अफवा पसरल्या. अखेर अहानने या सर्व अफवांवर मौन सोडत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “अनीत माझी बेस्ट फ्रेंड आहे”… अहान पांडे एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अहानला सरळ विचारण्यात आले की, “तुम्ही दोघे डेट करत आहात का?” यावर तो म्हणाला , “अनीत माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. सोशल मीडियावर लोक आम्ही सोबत असल्याचं समजतात, पण ते खरं नाही. केमिस्ट्री म्हणजे फक्त रोमांस नाही. ती कंफर्ट, सुरक्षितता आणि सोबत मिळणाऱ्या आधाराची भावना असते.” “अनीत माझी गर्लफ्रेंड नाही… आणि अनीतसारखं नातं कधी होणारही नाही!” अहान पुढे म्हणाला , “अनीत माझी गर्लफ्रेंड नाही. आणि माझं व अनीतचं नातं कधीही तसं होणार नाही.” तथापि, तो सांगतो की दोघांनीही ‘सैयारा’ या चित्रपटाचं स्वप्न एकत्र पाहिलं होतं, आणि ते सत्यात उतरताना पाहणं ही दोघांसाठीही खास भावना आहे. सध्या तो स्वतःला सिंगल असल्याचंही स्पष्ट करतो. ‘सैयारा’ चित्रपटाबद्दल ‘सैयारा’ ही एक भावनिक प्रेमकथा आहे. कृष – एक संगीतकार (भूमिका: अहान पांडे) वाणी – एक साधी, प्रेमळ मुलगी (भूमिका: अनीत पड्डा) कथेत वाणीला अल्झायमरची समस्या होते आणि ती सगळं विसरू लागते. यामुळे चित्रपट अधिक हृदयस्पर्शी बनतो. चित्रपटातील गाणी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाली. बॉक्स ऑफिस कलेक्शन: जागतिक ग्रॉस कमाई – ₹570 कोटी भारतातील कमाई – ₹328 कोटी अहान–अनीतच्या नात्याविषयीच्या चर्चांना आता स्वतः अभिनेत्यानेच पूर्णविराम दिला आहे.