Agriculture News : कृषी विभागाचा मोठा निर्णय ! ‘या’ शेतकऱ्यांवर होणार कारवाई

मुंबई : कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पीक विमा योजनेतील गैरवापर रोखण्यासाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बोगस पीक विमा काढल्याचा प्रकार समोर आल्याने शासनाकडून कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय होणार कारवाई?
जर शेतकऱ्याने खोट्या माहितीसह पीक विमा काढला असेल, तर विम्यासाठी भरलेली रक्कम शासनाकडे जप्त केली जाईल आणि भरपाई मिळणार नाही. तसेच, अशा अर्जदारांचा विमा अर्ज बाद करण्यात येणार आहे.
71 हजार शेतकऱ्यांची पडताळणी सुरू
हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत, 71 हजार शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा घेतला होता. कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी याची पडताळणी सुरू केली आहे. 25 एप्रिल ही पडताळणीची अंतिम मुदत होती. परंतु अजूनही 8 हजारांहून अधिक शेतकऱ्यांची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
कशी होणार कारवाई ?
शेतात केळी नसताना विमा घेतला असेल – अर्ज बाद
1 हेक्टर लागवड, पण 4 हेक्टरचा विमा घेतला असेल – कारवाई.
एका व्यक्तीने 4 हेक्टरहून अधिक क्षेत्रासाठी विमा घेतला – अर्ज बाद
2022-23 मध्ये मोठा गैरव्यवहार
2022-23 मध्येही मोठा गैरव्यवहार घडला होता.21,000 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा घेतल्याचे उघड झाले होते. शेवटी 7 हजार शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नव्हती. यंदादेखील अशीच कारवाई होण्याची शक्यता आहे.





