कृषी कायदे : निवडणुकीची चिंता कारणीभूत ठरली – चिदंबरम
Updated On:

नवी दिल्ली – कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेणे हा शेतकरी व कॉंग्रेसचा विजय आहे असे कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे. मोदींचे मत परिवर्तन झाले म्हणून त्यांनी हे कायदे मागे घेतलेले नाहीत तर केवळ निवडणुकीच्या चिंतेतून त्यांनी हा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकशाहीतील निदर्शनाच्या हक्कातून जे साध्य होऊ शकत नाहीं ते आज या देशात निवडणुकीच्या चिंतेतून साध्य होऊ शकते असेच वातावरण या निर्णयामुळे निर्माण झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
असे असले तरी शेतकऱ्यांसाठी हा मोठा विजय आहे आणि त्यांच्या बरोबरीनेच कॉंग्रेस पक्षाचाहीं विजय आहे कारण कॉग्रेंसने संसदेत आणि संसदेच्या बाहेरही या कृषी कायद्यांच्या विरोधात मोठा लढा दिला आहे





