कृषी पर्यटन केंद्र लवकरच सुरू होणार
Updated On:

पवनानगर – पवनमावळातील कृषी पर्यटन केंद्र करोना प्रादुर्भावामुळे मार्चपासून व्यवसाय बंद आहेत. परंतु पवना कृषी पर्यटन संस्थेच्या वतीने आमदार सुनील शेळके यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना देण्यासाठी करता येणाऱ्या उपाययोजना संदर्भात आढावा घेतला.
तसेच पवना धरणग्रस्त तरुणांनी केलेल्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.




