satara | कूपर आणि सिंफोनिया टेक्नोलॉजी यांच्यात करार

सातारा, (प्रतिनिधी)- येथील कूपर कॉर्पोरेशन या आघाडीच्या इंजिन, इंजिनचे सुटे भाग व जनरेटर उत्पादक कंपनीला हरित वाहतूक उपकरणे, उर्जा नियंत्रण आणि एअरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या सिंफोनिया टेक्नोलॉजी या कंपनीसह भागीदारी जाहीर करत करार करण्यात आला आहे. भारत, जपान आणि इतर आशियाई देशांत क्रांतीकारी एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करून देण्यासाठी हा करार करण्यात आला.
या ऐतिहासिक भागिदारीमुळे शाश्वत उर्जा सुविधा तयार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला गेला आहे. कारण कूपर कॉर्पोरेशनने सिंफोनिया टेक्नोलॉजीसह भागिदारीत तयार केलेला भारतातील अशा प्रकारचा पहिलाच 10 केव्हीए एलपीजी सीपीसीबीआयव्ही + प्रमाणित जेनसेट उपलब्ध करण्यात आला आहे.
सीपीसी बीआयव्ही+ ने भारतात घालून दिलेल्या कठोर उत्सर्जन निकषांचे पालन करत तयार करण्यात आलेला हा जेनसेट शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने मोठी झेप घेणारा असून त्यामुळे हरित उर्जा निर्मिती क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात होईल.
कूपर सिंफोनिया जेनसेट मॉडेल नाव CSG-0010L-IN आणि त्याचे भारतातील ब्रँड नाव ‘DAIMON’ असेल, जे सिंफोनिया स्थित असलेल्या शहराचे नाव आहे. हेच उत्पादन जपानमध्ये कूपर कॉर्पोरेशन गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत असलेल्या शहराच्या नावावरून ‘सातारा’ नावाने उपलब्ध केले जाईल.
या जेनसेटमुळे ग्राहकांना विविध प्रकारचे लाभ, गुणवत्तापूर्ण कामगिरी, वाजवीपणा आणि विश्वासार्हता मिळेल. याचे उत्सर्जन मर्यादित असून ते चालवण्यासाठी येणारा कमी खर्च व सोपी देखभाल यामुळे हे उत्पादन पारंपरिक डिझेल जेनसेट्स आणि ग्रीड पॉवरच्या तुलनेत दर्जेदार आणि किफायतशीर पर्याय ठरेल. इतर उर्जा स्त्रोतांच्या तुलनेत एलपीजी पर्यावरणावर कमीत कमी परिणाम आणि जास्त कार्यक्षमतेसह हरित आणि शाश्वत इंधन पर्याय म्हणून वेगळा ठरतो.
सिंफोनिया आणि कूपर कार्पोरेशन…
सिंफोनिया बहुराष्ट्रीय जपानी कंपनी असून 2021 वर्षअखेर त्यांची उलाढाल 94.5 बिलियन येन होती. 1917 मध्ये स्थापन झालेल्या या 100 वर्ष जुन्या कंपनीने विविध व्यावसायिक विभागांमध्ये प्रवेश केला आहे.
त्यात ऑटोमोटिव्ह टेस्टिंग यंत्रणा आणि सुटे भाग, एअरोस्पेस, व्यावसायिक वाहने, औद्योगिक रोबोट्स, कंट्रोलर्स, प्रिंटर यंत्रणा, क्लच आणि ब्रेक्स, रिजनरेटिंग मेडिसिन्स आणि शेती यांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे कूपर कॉर्पोरेश सुद्धा सुटे भाग, डिझेल व गॅस इंजिन्स उत्पादन क्षेत्रातील 100 वर्ष जुनी कंपनी आहे. कंपनीचे 13 कारखाने कार्यरत असून ते सर्व साताऱ्यात वसलेले आहेत. कंपनीमधले 400 पेक्षा जास्त कर्मचारी 40 वर्षांपासून काम करत आहेत. कूपर कॉर्पोरेशनच्या व्यावसायिक उत्पन्नात निर्यातीचा वाटा अंदाजे 50 टक्के असून आतापर्यंतची एकूण निर्यात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
‘कूपर कॉर्पोरेशनमध्ये आम्ही उर्जा निर्मिती क्षेत्रात कायम नाविन्य आणि शाश्वततेला प्राधान्य दिले आहे. सिंफोनिया टेक्नोलॉजीजसह आमची भागिदारी अत्याधुनिक तसेच ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगली सेवा देणारी उत्पादने तयार करण्याच्या समान ध्येयातून तयार झाली आहे.
एका खऱ्या पारसी उद्योजकाप्रमाणे आम्ही जे काम करतो, ते सर्वोत्कृष्ट असण्यावर भर देतो. – फारूख एन. कूपर (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि.)
‘उद्योगक्षेत्रातील समीकरणे नव्याने प्रस्थापित करणारे आधुनिक एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करून देण्यासाठी कूपर कॉर्पोरेशनसह भागिदारी करताना आनंद होत आहे.
सामाईक कौशल्य आणि गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाप्रती बांधिलकी यांच्या मदतीने ग्राहकांना हरित भविष्याकडे नेणारी विश्वासार्ह, पर्यावरणपूरक उर्जा उत्पादने मिळवून देत सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे.’- मासाकी तत्सुदा (व्यवस्थापक, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर सेल्स सेक्शन, सिंफोनिया टेक्नोलॉजी कं. लि.)





