Mig 29 Plane Crash : आग्रा येथे हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, पायलटने उडी मारून वाचवला जीव, पहा व्हिडीओ…

आग्रा – आग्रा येथे सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली असून येथे हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले आहे. जमिनीवर पडताच विमानाला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
पायलट आणि सहवैमानिकाने उडी मारून जीव वाचवला. सध्या या घटनेबाबत हवाई दलाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अपघातानंतर पायलट आणि त्याचे साथीदार दोन किलोमीटर अंतरावर सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
VIDEO | Indian Air Force’s MiG-29 fighter jet, which took off from Adampur in Punjab, crashes near Agra. The pilot and co-pilot ejected safely from the plane. Details awaited.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/KFOHIUHSFK— Press Trust of India (@PTI_News) November 4, 2024
वैमानिकाने शहाणपण दाखवत कागरौलच्या सोनिगा गावाजवळच्या रिकाम्या शेतात विमान उतरवलं. लोकवस्तीच्या परिसरात विमान कोसळले असते तर मोठे नुकसान झाले असते. प्राथमिक माहितीनुसार, हे मिग-29 विमान होते, ज्याने पंजाबच्या आदमपूर येथून उड्डाण केले होते. सध्या घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. पोलीस फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला आहे.




