युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर
येरवडा – केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्या विरोधात विविध शेतकरी संघटना 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुणे शहर युवा कॉंग्रेसच्या वतीने माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर भरपावसात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी युवा कॉंग्रेसच्यावतीने केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र युवक कॉंग्रेस सचिव अक्षय जैन यांनी केले.
युवा शहर अध्यक्ष विशाल मालके, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासहित रहुल शिरसाठ, राजू ठोंबरे, रोहित बहिरठ, सुमित नवले आदी उपस्थित होते.