नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईनंतर कन्या सना मलिक यांचा आक्रमक पवित्रा; म्हणाल्या, यापुढे…

मुंबई – नवाब मलिक सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत होते. त्यामुळे त्यांचे तोंड बंद करण्यासाठी ईडीने कारवाई केली यात शंका नाही, असा आरोप त्यांच्या कन्या सना मलिक यांनी केला आहे. यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढू, असा इशारा सना मलिक यांनी दिला आहे.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेतले. नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. नवाब मलिकांवर झालेल्या कारवाईनंतर सना यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमच्यावर जितके आरोप होतील, तितकी अधिक ताकद आम्हाला मिळेल अशी भूमिका सना मलिक यांनी घेतली आहे.
दरम्यान, माझे वडील 30 वर्षांपासून राजकारणात आहेत. आता त्यांच्यावर थेट टेरर फंडिंगचा आरोप झाला. आम्हाला जितका दाबण्याचा प्रयत्न कराल तितके आम्ही उसळून येऊ आणि कणखरपणे लढू, असे वक्तव्य सना मलिक यांनी केले आहे.





