‘वय वाढण्याऐवजी कमी होतयं’; सुनील शेट्टीचा लुक पाहून सगळेचं झाले चकित

Sunil Shetty | बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 90 च्या दशकात तो गाजलेल्या बॉलिवूड कलाकारांपैकी एक होता. आजही तो वयाच्या 63 व्या वर्षात हँडसम दिसत आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधील त्याचा लुक पाहून सर्वचजण चकित झाले आहेत.
सुनील शेट्टीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो नवीन हेअर स्टाइलमध्ये दिसत आहे. त्याने आपल्या लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांकडून अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, ‘अण्णांचे वय वाढण्याऐवजी कमी होत आहे,’ दुसऱ्याने लिहिले, ‘या वयातही हँडसम.’ ‘म्हातारा होण्याऐवजी तरुण कसे होताय’, अशा कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
सुनील शेट्टीने 1992 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी ‘बलवान’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या जगात प्रवेश केला. ९० च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांचा समावेश होता.
सुनील गेल्या वर्षी ‘ऑपरेशन फ्रायडे’मध्ये दिसला होता. यावर्षी तो अक्षय कुमारसह ‘वेलकम टू द जंगल’ या बिग स्टार चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘हेरा फेरी 3’ देखील आहे. यातही तिच्यासोबत अक्षय कुमार पडद्यावर दिसणार आहे.





