‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर पतीने पत्नीला पेटवले

अहमदनगर : हिंगणघाटमधील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा महिलेला पेटवल्याचे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधांचा व्हिडीओ पतीच्या मोबाईलमधे पाहिल्यानंतर पत्नीला पेटवून दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे घडली आहे. सदरील घटनेतील पीडितेवर अहमदनगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पीडितेने सोनई पोलीस ठाण्यात पतीसह प्रेयसी आणि सासूवर जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
स्वाती शंकर दुर्गे (वय 22) रा. मोरेचिंचोरे ता. नेवासा असे पीडितेच्या नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हण्टले आहे कि, पतीच्या फोनमध्ये एका महिलेशी प्रेमसंबंधाचा व्हिडिओ पाहिल्याच्या कारणावरून पती शंकर पाराजी दुर्गे यांनी माझ्या अंगावर पेट्रोल टाकून पेटविले. तसेच सासू चंद्रकला दुर्गे आणि पतीसोबत प्रेमसंबंद असणाऱ्या महिलेने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सदरील घटनेतील तिन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सोनई पोलिसांनी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करीत आहेत.
.





