अमेरिकेत टिकटॉकवर बंदी येताच इंस्टाग्रामने शोधली नवीन संधी, ‘या’ अॅपची केली घोषणा

Meta New App Edits Launch: भारतापाठोपाठ अमेरिकेतही शॉर्ट व्हीडिओ अॅप टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प सत्तेत आल्यानतंर हे अॅप पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता या संधीचा फायदा घेत इंस्टाग्रामने नवीन अॅपची घोषणा केली आहे. कंपनीने व्हीडिओ एडिटिंगसाठी नवीन अॅप लाँच केले आहे.
यापूर्वी भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्यानंतरही इंस्टाग्रामने रिल्स फीचर लाँच केले होते. टिकटॉक बंद झाल्याने रिल्सची लोकप्रियता देखील वाढली. आता अमेरिकेत टिकटॉक सुरू राहणार की बंद होणार, याबाबत प्रश्न असतानाच, इंस्टाग्रामने Edit नावाच्या अॅपची घोषणा केली आहे.
अमेरिकेत टिकटॉकसोबतच CapCut हे अॅप देखील अॅपल अॅप स्टोर आणि प्ले स्टोरवरून हटवण्यात आले आहे. CapCut हे अॅप देखील Bytedance कंपनीचेच आहे. या अॅपचा वापर प्रामुख्याने व्हीडिओ एडिटिंगसाठी केला जातो. त्यामुळे आता मेटाकडून या अॅपचा पर्याय म्हणून Edits अॅप आणण्यात आले आहे.
View this post on Instagram
Edits अॅपला CapCut चे क्लोन म्हटले जात आहे. हे पूर्णपणे मोबाइल व्हीडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. कंपनीने या अॅपची घोषणा करताना क्रिएटर्ससाठी यात अनेक फीचर्स देण्यात आल्याचे म्हटले आहे. यामध्ये यूजर्सला व्हीडिओ एडिटिंगसाठी वेगवेगळे फीचर्स मिळतील. या अॅपद्वारे एडिट करण्यात आलेला व्हीडिओचा ड्राफ्टही मित्रांना शेअर करता येईल.
Edits अॅप अॅपल अॅप स्टोरवर प्रीऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहे. तर अँड्राइड यूजर्सला डाउनलोड करण्यासाठी पुढील महिन्यात प्ले स्टोरवर उपलब्ध होईल.

