पुणे जिल्हा | विजयानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

नारायणगाव, (वार्ताहर) – विजयाचे सर्व श्रेय शिरूर लोकसभा मतदार संघातील मायबाप जनता, महाआघाडीतील प्रत्येक घटक पक्षातील जीव तोडून काम करणारा जीवाभावाचा कार्यकर्त्यांना आहे. एका मोठे नेत्याने विजय कसा होतो? असे आव्हान दिल्यानंतर भल्याभल्यांची भविष्यवाणी केली होती की, कोल्हे निवडून येतील का? कोल्हे यांच्याकडे यंत्रणा नाही, समोरचे उमेदवार धनशक्तीचे आहे, सत्ता आहे,
तेव्हा मी म्हणत होतो की पुढचे म्हणतात की मेरे पास गाडी हैं, बंगला हैं, तुम्हारे पास क्या हैं? तेव्हा माझे उत्तर होते की, मेरे पास जनता हैं, अशी प्रतिक्रिया शिरूर लोकसभेचे विजयी उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आजच्या निकालामुळे विरोधी पक्षातील आमदारांचे टेन्शन वाढले आहे. एका पत्रकाराने आजच सांगितले की 2019 ला अशीच परिस्थिती होती, त्यावेळी एकच आमदार आमच्या बाजूने होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकचे 5 आमदार झाले होते, आता या निवडणुकीत एक आमदार आमच्या सोबत होता, त्यांचे टेन्शन निश्चितच वाढले असणार किंवा त्या आमदारांना टेन्शन येऊ शकते, पुन्हा एकचे पाच आमदार होतील, असे भाकीतही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
आगामी ध्येय :
शिवनेरी गडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी तर वढू-तुळापूर येथे शंभुसृष्टी उभारण्याला प्राधान्य, इंद्रायणी नदी प्रदूषण व मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घनकचरा करण्यासाठी प्रयत्न आहे. मतदारसंघातील अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क, इनडोअर स्टेडियम, शिवनेरी गडावर जाण्यासाठी रोप वे आदी प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न राहणार आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या कामांमुळे त्यांना खासदार म्हणून जनतेने पुन्हा काम करण्याची संधी व मतदानाद्वारे कौल दिला आहे. हे श्रेय त्यांच्या एकट्याचे नसून त्यांच्यासाठी काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आहे, या सर्वांचे आभार. – डॉ. अश्विनी अमोल कोल्हे





