‘अॅनिमल’च्या यशानंतर रश्मिका मंदान्नाने शेअर केला काश्मीरमधील सुंदर व्हिडिओ

Rashmika Mandanna : अभिनेता रणवीर कपूर (Ranveer Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता रश्मिकाने ‘काश्मीर’ मधील सुंदर फोटो शेअर केला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका काश्मीरमध्ये धमाल-मस्ती करताना दिसत आहे.
या व्हिडिओत ‘अॅनिमल’मधील ‘काश्मीर’ हे गाणं वाजताना ऐकू येतं आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलंय, “या गाण्यातलं केवळ काश्मीरचं नाही तर हे गाणंही मला खूप आवडतं. या व्हिडिओत बर्फ पडतोय त्यामुळे मला वाटतं की हा परफेक्ट गाण्यासाठीचा परफेक्ट व्हिडिओ आहे. माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.”
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये, तिनं निळ्या रंगाची जीन्स परिधान केली असून ती बूटासह रंगीत जम्परसह दिसत आहे. यातील तिचा क्युट अंदाज अनेकांच्या पसंतीस पडत आहे. रश्मिकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही जण तिचं कौतुक होत आहे. तर दुसरीकडे काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. रश्मिकाची पोज नेटकऱ्यांना न आवडल्याने त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात रश्मिकानं रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीची भूमिका केली आहे. जगभरात या सिनेमाने 600 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. याशिवाय रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाला ती डेट करत असल्याची चर्चाही अनेकदा रंगली आहे.





