Sai Pallavi : सीतेच्या भूमिकेनंतर साई पल्लवीचा नवा लुक चर्चेत! केस कापल्यानंतर आई-वडिलांना बसला धक्का; अभिनेत्री म्हणाली…
Sai Pallavi : कलाकारांना एखाद्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी अनेकदा आपल्या लुकमध्ये मोठे बदल करावे लागतात. साई पल्लवीनेही ‘ओम’ चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी केस कापण्याचा धाडसी निर्णय घेतला.

Sai Pallavi : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकली आहे. तिच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रशंसा होत आहे. अशातच तिच्या आगामी ‘ओम’ चित्रपटातील लुकची जोरदार चर्चा रंगली आहे.
या चित्रपटातील भूमिकेसाठी साई पल्लवीने चक्क आपले केस कापले असून, ही गोष्ट तिच्या आई वडिलांना समजल्यानंतर काय घडलं होतं याविषयीचा एक किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला.
कलाकारांना एखाद्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी अनेकदा आपल्या लुकमध्ये मोठे बदल करावे लागतात. साई पल्लवीनेही ‘ओम’ चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी केस कापण्याचा धाडसी निर्णय घेतला. ती या चित्रपटात एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
साई पल्लवीचा लुक पाहून आईने केला फोन कट!
मुलाखतीत साई पल्लवीने सांगितले की, केस कापल्यानंतर तिने आई-वडिलांना व्हिडिओ कॉल केला. मात्र, तिचा केस कापल्याचा अवतार पाहून आईला मोठा धक्का बसला आणि तिने थेट फोन कट केला. त्यानंतर साईने पुन्हा आई-वडिलांशी संपर्क साधून आपण केस का कापले, यामागचे कारण समजावून सांगितले.
सुरुवातीला आईने तिचे केस खरेच कापले आहेत की विग घातला आहे, अशी विचारणा केली. त्यावर साई पल्लवीने आपण खरोखरच केस कापल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर आई-वडिलांना मोठा धक्का बसला. मात्र, चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी हा बदल केल्याचे तिने त्यांना पटवून दिले.
‘भूमिकेसाठीच केस कापले’
याबाबत बोलताना साई पल्लवी म्हणाली, “मी केवळ माझ्या व्यक्तिरेखेसाठी केस कापले. अन्यथा मी असा निर्णय कधीच घेतला नसता.” दरम्यान, राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित ‘ओम’ हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात साई पल्लवीसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता, धनुष, मामूट्टी यांच्यासह अभिनेत्री श्रीलीला महत्वाच्या भूमिकेत आहे.






