घटस्फोटानंतर नागा चैतन्य-समंथा दिसणार पुन्हा एकत्र, या चित्रपटात करणार काम

मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य घटस्फोटानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर या जोडीचे चाहते खूप खूश आहेत.
असे मानले जाते की निर्मात्यांनी या जोडीला नवीन प्रोजेक्टसाठी संपर्क साधला आहे. जर दोघांनीही सहमती दर्शवली तर समंथा आणि नागाला पुन्हा एकत्र पाहणे मनोरंजक असेल.
दरम्यान, समंथाने यापूर्वी तिच्या आजाराविषयी पोझ दिली होती. त्यानंतर वेळोवेळी अभिनेत्रीचे माजी पती तिच्या तब्येतीची माहिती घेत असतात. सामंथाच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, ती यशोदा चित्रपटात दिसणार आहे. 2017 मध्ये दोघांचे लग्न झाले होते, मात्र अवघ्या 4 वर्षांत समंथा आणि नागा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
दोघांनीही आपापल्या आयुष्यात प्रगती केली आहे. त्यांच्या घटस्फोटच्या बातमी नंतर चाहते नाराज झाले होते, मात्र आता येत्या काळात चित्रपटात एकत्र दिसणार असल्याच्या चर्चांवर चाहत्यांकडून सोशलवर आनंद व्यक्त केला जात आहे.





