व्हाइट हाउसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले की, ट्रंप यांनी अलास्काहून वॉशिंग्टनला परतताना झेलेन्स्की यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. या कॉलमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, नाटोचे महासचिव मार्क रूट, युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन आणि जर्मन चान्सलर फ्रेडरिक यांचाही सहभाग होता.
\nरशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षे –
\nरशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या चार वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
ओव्हल ऑफिसमधील वाद
\nयावर्षी फेब्रुवारीत ओव्हल ऑफिसमध्ये झेलेन्स्की आणि ट्रंप यांच्यातील चर्चेदरम्यान वाद झाला होता. मात्र, नंतर झेलेन्स्की यांनी हा वाद दु:खद असल्याचे सांगत, कायमस्वरूपी शांतीसाठी ट्रंप यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. ही भेट रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांतीप्रस्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.