Vaibhav Naik on Bharat Gogawale | ठाकरे गटाच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. अनेक नेते ठाकरेंना राम राम करत शिंदेंच्या शिवसेनेचे धनुष्य बाण हातात घेत आहेत. तसेच काही नेत्यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच कोकणातील ठाकरे गटाचे बडे नेते असलेले राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर भास्कर जाधव देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तसेच आता माजी आमदार वैभव नाईक यांच्याबाबत भरत गोगावलेंनी मोठा दावा केला आहे. वैभव नाईक यांच्या मागे एसीबी चौकशी ससेमिरा राजन साळवी यांच्या मागे एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यानंतर ते एक दोन वेळा उद्धव ठाकरे यांना भेटले आणि अखेर शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला. तर दुसरीकडे वैभव नाईक यांच्या मागे देखील एसीबी चौकशी ससेमिरा लागला आहे. वैभव नाईक यांनी देखील उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. Vaibhav Naik on Bharat Gogawale | भरत गोगावले काय म्हणाले? भरत गोगावले म्हणाले की, “वैभव नाईक यांच्याशी चर्चा सुरू आहे. सगळ्याच गोष्टी आम्ही उघडपणे सांगणार नाही. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. परंतु योग्य वेळेला तुम्हाला सांगू. वैभव नाईक यांची एसीबीची चौकशी सुरू आहे म्हणजे ते आरोपी झाले असे नाही. ते चौकशीला सामोरे जातील आणि त्यातून काही निर्णय ते घेतील,” असे त्यांनी म्हटले आहे. भरत गोगावलेंच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. Vaibhav Naik on Bharat Gogawale | याशिवाय ठाकरे गटाने लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. याबाबत भरत गोगावले म्हणाले की, “या मिटिंग जर त्यांनी अगोदरच घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती. परंतु ही वेळ आणून देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले आहे. कारण एकनाथ शिंदे हे सामान्य माणसाचे नेते आहेत. ते काम करत आहेत त्यामुळे लोकांना विश्वास वाटत आहेत. त्यामुळेच लोक एकनाथ शिंदे यांच्याकडे येत आहेत. येत्या आठवड्याभरात कोकणामध्ये आमच्या पक्षात अनेक लोक येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गोगावले यांच्या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी “वैभव नाईक हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्वत:ला बाजारात विकायला ठेवलेलं नाही. भरत गोगावले सारखे दलाली वृत्तीचे राजकारणी ज्या पद्धतीने वैभव नाईक यांची प्रतिमा मलिन करतात, त्याचा आपण धिक्कार करतो,” असे म्हणाले आहे. हेही वाचा: मनसेनंतर आता भाजपने मशिदींमधील अजानविरुद्ध राग आळवला ; किरीट सोमय्या म्हणाले- ‘आता अत्याचार …’