Huma Qureshi : बॅालिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी एकामागून एका चित्रपटात दमदार भूमिकेत दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच तिची दिल्ली क्राइम्स या वेबसिरीजमधील भूमिका लक्ष वेधून घेणारी ठरली. आता ती दाक्षिणात्य अभिनेता यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपटात झळकणार असून, चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यशच्या टॉक्सिक चित्रपटाची प्रचंड उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असून चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांची नजर असते. नुकताच अभिनेत्री कियारा अडवाणीचा चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करण्यात आला होता. आता अभिनेत्री हुमा कुरेशीचा देखील फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. या लूकमध्ये हुमाने काळ्या रंगाचा ड्रेस वेअर केल्याचे दिसत आहे. ती एका गाडीजवळ उभी आहे कोणाची तरी वाट पाहत, असल्याचे दिसत आहे. हुमाचा लूक शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘टॉक्सिक – फेयरी टेल फॉर ग्रोन्स. या लूकमध्ये हुमा एका राणीसारखी दिसत असून तिचा लूक तिच्या व्यक्तिरेखेची ताकद किती आहे याचा अंदाज दर्शवत आहे. या चित्रपटातील कियारा अडवाणीचा लूकही यापूर्वी समोर आला होता. अभिनेता यशने स्वतः कियारा अडवाणीचा लूक सोशल मीडियावरून शेअर केला होता. गीतू मोहनदास दिग्दर्शित “टॉक्सिक” हा चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यश चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाची नेमकी कथा आणि कलाकारांबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. यश व्यतिरिक्त आतापर्यंत कियारा अडवाणी आणि हुमा कुरेशी यांचे लूक समोर आले आहेत. त्यामुळे आणखी कोणते कलाकार चित्रपटात असणार याची मोठी उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट मोठ्या स्केलवर तयार करण्यात येत आहे. २०२५ मध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणारा होता पण काही कारणामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबविण्यात आले असून आता नवीन माहितीनुसार, मार्च २०२६ पर्यंत कधीही हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. हेही वाचा : अनन्याला भेडसावतेय ‘ही’ समस्या; स्वतः केला खुलासा, म्हणाली ” मी अनेकदा विसरते की…”