छावानंतर अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या एका प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिकेत असणार असल्याची माहिती खुद्द विकीने दिली आहे. हा नवा प्रोजेक्ट २०२६ मध्ये ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. या प्रोजेक्टचे नाव लव्ह अँड वॅार असणार आहे. रणबीर, आलिया आणि विकी हे तीन कलाकार या प्रोजेक्टमध्ये एकत्रित स्क्रीन शेअर करताना पाहायला मिळणार आहेत. विकीने आलियासोबत याआधी राजी चित्रपटात काम केले आहे, मात्र रणबीरसोबत या चित्रपटातून विकी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘लव्ह अँड वॉर’ हा एक रोमँटिक कथानक असलेला चित्रपट असणार आहे. त्यात अॅक्शन सीन देखील असणार असल्याचे विकीने संकेत दिले आहेत. विकी कौशलने सांगितले की या चित्रपटात त्याची भूमिका अद्वितीय आणि पूर्णपणे वेगळी असणार आहे. याचे कारण म्हणजे संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट मोठ्या स्केलवर तयार केले जातात. तसेच त्यांच्या चित्रपटांची भव्यता खूप मोठी असते. विकीने भन्साळी यांचे खूप कौतुक केले असून त्यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याचे त्याने सांगितले. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता सध्या विकी कौशल त्याच्या छावा चित्रपटाला घेऊन उत्सुक आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. त्याआधी चित्रपटातील कलाकारांकडून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात येत आहे. छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी असून महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे. तर औरंजेबची भूमिका अक्षय खन्ना साकारत आहे.