बॅाबी देओलनंतर आता श्रीलिलाचाही डॅशिंग लुक व्हायरल! चाहत्यांनी केले भरभरून कौतुक

Srilila : नुकताच अभिनेता बॅाबी देओलचा एक डॅशिंग लुक समोर आला होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्याने चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. अशातच आता दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिचा याच अंदाजातील अनोखा लुक शेअर केला आहे. या लुकला खूप पसंत केले जात आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला लवकरच एजंट मिर्चीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात बॉबी देओलसोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे. सिनमाचे नाव अद्याप जाहीर झालेले नसले तरी चाहत्यांना श्रीलीलाचा लूक खूपच आवडला आहे.
View this post on Instagram
या पोस्टरवरून असे दिसून येते की हा एक अॅक्शनने भरलेला, मजेदार सिनेमा असणार आहे. श्रीलीलाने तिचा जबरदस्त लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला “रेडी, स्टेडी, फायर… चिली लगा वाली है.” असे कॅप्शन तिने दिले आहे. १९ ऑक्टोबर #आगलगेदे.” असेही तिने लिहिले आहे.
श्रीलीलाची ही पोस्ट सोशल मीडियावर काही मिनिटातच व्हायरल झाली आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने म्हटले, ‘सिंड्रेला आता लेडी जेम्स बाँड बनली आहे’, तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘लीला ऑन फायर अॅक्शन’. श्रीलीलाचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स अॅानफ्लोअर आहेत. ३१ अॅाक्टोबरला तिचा रवी तेजासोबत मास जठारा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय ती अनुराग बसू दिग्दर्शन करत असलेल्या आशिकी ३ सिनेमा दिसणार आहे.
हेही वाचा : “मी अशा छोट्याशा गावाची आज..”; कंगणाने सांगितले स्ट्रगलिंगचे दिवस, शाहरुख खानचा उल्लेख अन्…





