अंबरनाथ : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना आता अंबरनाथमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 35 वर्षीय आरोपीने 9 वर्षीच्या चिमुकलीला अश्लील चित्रफीत दाखवून शौचालयात नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
संतोष कांबळे असे आरोपीचे नाव आहे. अंबरनाथमध्ये राहणारी पीडिता सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने २१ ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा नोंद करत आरोपीला अटक केली.
यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.