Ranbir Kapoor | दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा ‘स्पिरिट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहेत. या चित्रपटात मुख्यभूमिका साऊथ सुपरस्टार प्रभास दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान आता या चित्रपटातबाबत एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात एक बॉलिवूड अभिनेता टर्निंग पॉइंट घेऊन येणार आहे. या चित्रपटासाठी वांगा यांनी पुन्हा एकदा त्यांचा ‘अॅनिमल’मधील अभिनेता रणबीर कपूरशी संपर्क साधला आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीर कपूरला ‘स्पिरिट’मध्ये कॅमिओ रोलची ऑफर दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्पिरिट या चित्रपटात रणबीर कपूर अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूरचा हा कॅमिओ केवळ एक छोटी भूमिका नसेल, तर तो ‘स्पिरिट’च्या कथानकाला एक मोठे आणि अनपेक्षित वळण देणारा ठरणार आहे. स्पिरिटच्या आधी वांगा यांनी रणबीर कपूरची ‘अॅनिमल‘ बनवली होती, ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता आणि या चित्रपटाने ९१५ कोटींचा व्यवसाय केला होता. जर दोघे स्पिरिटमध्ये एकत्र दिसले, तर रणबीर कपूर आणि प्रभास हे दोन मोठे सुपरस्टार्स पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसतील. मात्र आतापर्यंत निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. Ranbir Kapoor | अभिनेत्री तृप्ती डिमरीची चित्रपटात एन्ट्री दरम्यान, या चित्रपटासाठी सुरुवातीला दीपिका पदुकोणला कास्ट करण्यात आले होते, परंतु कामाच्या वेळेवरून वाद निर्माण झाल्यामुळे तिला चित्रपटातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर यात अभिनेत्री तृप्ती डिमरीची चित्रपटात एन्ट्री झाली. यात प्रभास आणि तृप्ती डिमरी यांच्यासह विवेक ओबेरॉय, कांचना आणि प्रकाश राज यांसारखे दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत. रणबीर कपूर आणि प्रभास हे दोन मोठे सुपरस्टार्स पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसतील. Ranbir Kapoor | हेही वाचा: “शाहरुख, सलमान आणि…” ; आमिषा पटेलने सांगितली धर्मेंद्र यांच्या भेटीची शेवटची आठवण म्हणाली ” सनीला स्वतः हा धक्का…”