Advisory for USA people। इराणमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून सरकारविरोधी निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांमध्ये ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशातील वाढती महागाई आणि चलन घसरण्याच्या प्रतिक्रियेतून हे निदर्शने केली जात आहेत. दरम्यान, अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. अमेरिकन दूतावासाकडून सूचना जारी Advisory for USA people। अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या सूचनांमध्ये,” इराणमध्ये निदर्शने वाढत आहेत आणि ती हिंसक होऊ शकतात, ज्यामुळे अटक आणि अधिक जखमी होण्याची शक्यता आहे. कडक सुरक्षा उपाय आणि रस्ते बंद केल्याने सार्वजनिक वाहतूक कठीण होत असल्याचे वृत्त आहे ,असे म्हटले आहे. ‘रस्त्याने आर्मेनिया किंवा तुर्कीला प्रवास करण्याचा विचार करा’ इराणी सरकारने मोबाइल फोन, लँडलाइन आणि राष्ट्रीय इंटरनेट नेटवर्कवर प्रवेश प्रतिबंधित केला आहे. एअरलाइन्स इराणला जाणाऱ्या आणि येणाऱ्या फ्लाइट मर्यादित करत आहेत किंवा रद्द करत आहेत, अनेकांनी शुक्रवारपर्यंत त्यांच्या सेवा निलंबित केल्या आहेत. या सूचनांमध्ये असे म्हटले आहे की ,”अमेरिकन नागरिकांनी सतत इंटरनेट व्यत्ययांसाठी तयार राहावे आणि या काळात संवादाचे पर्यायी मार्ग शोधावेत. त्यात पुढे म्हटले आहे की जर ते सुरक्षित असेल तर त्यांनी आर्मेनिया किंवा तुर्कीला रस्त्याने प्रवास करण्याचा विचार करावा.” इराणने सर मर्यादा ओलांडल्या Advisory for USA people। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी राजवटीला निदर्शकांच्या हत्येचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी रविवारी सांगितले की इराणने लाल रेषा ओलांडली आहे. दरम्यान, इराणने प्रत्युत्तर दिले आहे. तेहरान म्हणतो की जर त्यांच्यावर हल्ला झाला तर ते गप्प बसणार नाहीत. त्यांनी अमेरिकन तळांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. यादरम्यान इस्रायल देखील हाय अलर्टवर आहे.