रानू मंडलला दिला सल्ला अन् लता मंगेशकर झाल्या ट्रोल
Updated On:

मुंबई – पश्चिम बंगालधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडल या महिलेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले. याच मुद्यावरून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रानूला ट्विट करत सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, कुठलीही नकल फार काळ टिकत नसते.
लता मंगेशकर यांनी ट्विट केले आहे की,’माझ्या नावाने आणि मी गायलेल्या गाण्यांनी कुणाचे भले होत असेल तर मला आनंदच आहे. पण गायकी ओरिजिनल नसेल तर यश अल्पजीवी असते.’ मात्र या सल्ल्यावर त्यांना युजर्सने प्रतिक्रिया देत चांगलेच ट्रोल केले जात आहे.





