दिशादर्शक कमानींवर जाहिरातीस बंदी

पालिके व्यतिरिक्त इतर सर्व जाहिरातींना बंदी

पुणे – महापालिकेच्या मालकीच्या 95 दिशादर्शक कमानी (गॅन्ट्री)वर यापुढे महापालिका वगळता इतर कोणत्याही स्वरुपातील जाहिरातींना प्रशासनाने बंदी घातली आहे. शहरातील अनधिकृत जाहिराती आणि 2017 मध्ये महापालिके ई-ऑक्‍शन करून या “गॅन्ट्री’वर जाहिराती लावण्यासाठी दिलेला परवाना याबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने महापालिका प्रशासनाकडून याबाबत निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे कार्यालयीन आदेश काढण्यात आले आहेत.
महापालिकेकडून शहरात 27 ठिकाणी दिशादर्शक कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानींवर दोन्ही बाजूंना अर्ध्या भागात जाहिरातीसाठी परवानगी देण्यात येते.

या कमानी बीओटी तत्त्वावर उभारण्यात आल्या होत्या. त्याची मुदत संपल्याने त्यावर जाहिरातींसाठी पालिकेने 2017 मध्ये ई-ऑक्‍शन राबविले होते. मात्र, या ऑक्‍शनबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली असून त्यावर सुनावणी सुरू आहे. असे असतानाच; या गॅन्ट्रीवर मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जात असून त्यात पालिकेचीही कोणतीही मान्यता घेतली जात नाही. त्यावरूनही न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात पालिकेच्या या अनागोंदी कारभाराबाबत न्यायालयाने पालिकेचे कान टोचले आहेत. ही बाब लक्षात घेऊन या पुढे कोणत्याही स्वरुपाची राजकीय, व्यावसायिक जाहिरातींना परवानगी देऊ नये, असे आदेश काढण्यात आले आहेत.

तत्काळ गुन्हा दाखल करणार

अशा कमानींवर कोणीही जाहिरात केल्याचे आढळल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे अधिकार संबंधित महापालिका सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच, ही जाहिरात तातडीने काढून त्याची सविस्तर माहितीही या अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. या शिवाय, या फलकांवर केवळ पालिकेची जाहिरात केली जाणार असून त्यासाठी संबंधित विभागाने आकाशचिन्ह आणि परवाना विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.