पुणे –महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट-क प्रवर्गातील नऊशे पदांच्या भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी 3 एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, गृह विभाग आणि उद्योग व ऊर्जा विभागात लिपिक-टंकलेखक, कर सहायक, तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक अशा पदांचा जाहिरातीमध्ये समावेश आहे. राज्यभरातील 3 एप्रिल 2022 ला राज्यातील 37 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना 11 जानेवारीपर्यंत अर्ज करून शुल्क भरता येईल. परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. एमपीएससीकडून 2 जानेवारीला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची प्रवेशपत्रे ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिली आहेत.