Pimpri : ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

चिंचवडगाव : भाजपाचे प्रदेश सदस्य आणि माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
चिंचवडगावातील गोशाळेत गोमातांना चारा वाटप, प्रभाग क्र. १८ मधील जेष्ठ नागरिकांचा सत्कार, आयुष्यमान भारत वयोवंदना योजना अंतर्गत स्मार्ट कार्ड वाटप, नवमतदार नोंदणी अभियान, तसेच मोफत आधार व मतदान कार्ड वाटप अशा उपक्रमांची राबवणूक झाली.
या अभिष्टचिंतन सोहळ्याला भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, विश्व हिंदू परिषदेचे धनंजय गावडे आणि सिटी प्राईड स्कूलचे डॉ. अभय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शेडगे यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
जेष्ठ नागरिकांना छत्र्या व उबदार शालींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पै. ज्ञानेश्वर शेडगे, सचिन बोधणी, जितेंद्र देव उपस्थित होते. सूत्रसंचालन अजित कुलथे तर आभार मधुकर बच्चे यांनी मानले.





