पिंपरी – शहरातील डॉ. ऍड. जया बाळकृष्ण उभे या महिला वकीलाच्या नावावर विविध विद्यापीठे व शासनमान्य शैक्षणिक संस्थांच्या 48 पदव्या प्राप्त करण्याचा शैक्षणिक विक्रम नोंदविला गेला आहे.
त्यांच्या या विक्रमाची ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या या कार्यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. ऍड. जया उभे या व्यवसायाने वकील असून, त्या पिंपरीत वकीली व्यवसाय करत आहेत. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असल्याने, अतिशय बिकट परिस्थितीतही त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. हे करत असतानाच त्यांनी देशभरातील विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांच्या एकूण 48 पदव्या प्राप्त केल्या आहेत.
राज्याचे माजी अर्थमंत्री स्व. श्रीकांत जिचकार यांच्या 50 पदव्यांचा विक्रम मोडण्याचा त्यांचा मानस आहे.