नवी दिल्ली – केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर एक सामाजिक भूमिका घेणारा, माणूसकीवर प्रेम करणारा आणि स्वताची वेगळी विचारशैली असणारा दाक्षिणात्य अभिनेते ‘प्रकाश राज’ यांनी अनाथ मुलीला लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करण्यास मोठी मदत केली आहे. यापूर्वी सुद्धा प्रकाश राज यांनी अनेक लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दरम्यान, प्रकाश यांच्या या कामामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
फिल्ममेकर नवीन मोहामेडिल यांनी व्टिटरवर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. नवीन यांनी आपल्या व्टिटमध्ये लिहिलं आहे की, प्रकाश राज यांना मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांनी केलेल्या कामासाठी धन्यवाद. त्यांनी श्री चंदन नावाच्या अनाथ मुलीची मदत केली आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्या मुलीला लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करता येणार आहे.
Thank you too @NaveenFilmmaker for bringing my attention to this. It’s a joy when many hands join together to make a difference..stay blessed.. “the joy of empowering” #bliss https://t.co/TnFziFUO51
— Prakash Raj (@prakashraaj) December 15, 2021
याशिवाय तिला नोकरी शोधण्यासाठी काही पैसेही दिले आहेत. कुणाच्या आयुष्यामध्ये एवढं परिवर्तन आणण्यासाठी मी सरांना मनपूर्वध धन्यवाद देतो. नवीन यांच्या या व्टिटला प्रकाश राज यांनी उत्तर दिलं आहे. प्रकाश राज यांनी लिहिलं आहे की, माझ्याविषयी लिहिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद.!!’ या आशयाचे ट्विट नवीन यांनी केलं आहे.