Jamkhed Election | राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती अशा एकूण २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल आज २१ डिसेंबर जाहीर होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून, कल हाती यायला लागले आहेत. याचदरम्यान, दुसर्या फेरीत मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधील मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे जामखेड येथील मतमोजणी थांबवली आहे. यामुळे आता प्रशासनाचा सावळा गोंधळ उघड झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, निकालाला उशीर होत असल्याने उमेदवार आणि समर्थकांमध्ये धाकधूक वाढली असून केंद्राबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.