पुणे जिल्हा | भोर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट

भोर, (प्रतिनिधी)- भोर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून भोर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता मतदान केंद्र, मतदान कार्यपद्धती साठी प्रशासनाकडुन तयार करण्यात आलेल्या तयारीची माहिती भोर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
भोर तहसिल कार्यालय निवडणूक यंत्रणेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी अधिकारी उपविभागीय अधिकारी डॉ. खरात उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार निवास ढाने, नायब तहसीलदार अजिनाथ गाजरे उपस्थित होते.
डॉ. खरात म्हणाले की, भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यात ४७७ गावे असून तालुक्यात २४०, वेल्हे ९६ तर मुळशीत ३१८ असे एकूण ५६४ मतदान केंद्र आहेत. भोर तालुक्यात बुरुडमाळ येथे सर्वात कमी मतदार २० महिला आणी २० पुरुष, असे ४० मतदार आहेत.
भोर तालुक्यात रायरेश्वर हे सर्वात उंचीवर आसलेले मतदान केंद्र असून १६० मतदार आहेत. तीनही तालुक्यात एकूण ४ लाख २१ हजार ५५३ मतदार आहेत. एकाच टप्यात निवडणूक होणार असून २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर सुटटी दिवस वगळुन अर्ज स्वीकारले जाणार आहे.
दि. २३ नोव्हेंबर मतमोजणी कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे होणार आहे. पुरुष मतदार २ लाख २३ हजार ३५६ तर महिला मतदार १ लाख ९८ हजार १९१, तृतीयपंथी ६, असे एकूण ४ लाख २१ हजार ५५३ मतदार आहेत.
१५०० पेक्षा अधिक मतदान असणारे एकही केंद्र नसून शहरी मतदान केंद्र ५४ तर ग्रामीण ५०० मतदान केंद्र आहेत सर्वात लहान बुरुडमाळ ४० मतदान केंद्र आहे. निवडणुकीसाठी सुमारे ३ हजार कर्मचारी लागणार या शिवाय राखीव ५०० कर्मचारी ३५०० कर्मचारी ७० झोनल ऑफिसर आहेत.
प्रशिक्षण नवसहयाद्री घेणार आहे.इव्हीएम आयटीआयला घेणार स्टाँगरुम आयटीआयला साहित्य वाटप पानशेत, वेल्हे, भोर, मुळशी आहेत. महिला मतदान कर्मचारी ज्या त्या मतदार संघातच काम करणार आहेत. आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.
चोवीस तास ९ एसएसटी ९ हँडा स्काँड राहतील तीन तालुक्यात गटविकास अधिकारी आचार संहिता प्रमुख नेमले आहेत. एक खिडकी योजनेतून अर्ज घेऊन परवानगी दिली जाणार आहे.
मुळशीतील सोसायटीमध्ये मतदान सुविधा
मतदान टक्का वाढावा म्हणून मुळशी तालुक्यात सोसायटीमध्ये मतदान सुविधा करुन दिल्या आहेत.
बावधन, हिजवडी व इतर अशा ५ सोसायटीमध्ये ६ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. मतदानात वाढ व्हावी म्हणून सोसायटी मतदान केंद्र स्थापन केली आहेत. मतपत्रिका वाटप करणार आहोत. १३ पुराव्यापैकी एक पुरावा दिला तरच मतदान करता येणार आहे.
अपंग किंवा ८५ वर्षावरील यांना सर्व सोयी सुविधा देणार येणार आहोत. अर्ज दाखल करण्यासाठी २२ ते २९ सकाळी ११ ते ३ वेळेत असून राजकीय पक्षाना एक सूचक लागतो. तर इतराना १० सूचक लागतात एका उमेदवाराला चार अर्ज भरता येतील.
राजकीय पक्षांनी २९ ऑक्टोंबरला ३ वाजेपर्यंत बी फार्म दिला पाहिजे तर ॲफिडेव्हिट शेवटच्या दिवसापर्यत द्यावे. सी व्हीजीन अँपवर आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणार आहे. तक्रार झाल्यास त्यानंतर ५० मिनटात दखल घेतली जाईल, असे निवडणूक अधिकारी डॉ. खरात यांनी सांगितले.

