पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिफेक्टरी’ (भोजनालय) येथे सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सुविधा बंद केली होती. त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी काल रिफेक्टरी समोर आंदोलन करीत आक्रमक पवित्रा घेतला होता. या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांनी दंगा घातला आणि सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत प्रशासनाने पोलीस तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
रिफेटक्रीचे नवीन नियम हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक करणार आहेत. त्यामुळे हे सर्व नवे नियम रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. दरम्यान, सोमवारी दुपारी बारा वाजता रिफेक्टरीच्या समोर 100 हून अधिक विद्यार्थी होते. त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. रिफेक्टरीच्या नवीन नियमावली रद्द करण्याचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना दिले होते.
असे आहेत नवीन नियम
* “रिफेक्टरी’त सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणार
* “रिफेक्टरी’त टीव्ही बंद; विद्यावाणी रेडिओ सुरू
* एकाच ताटात दोघांना जेवण करता येणार नाही
* “रिफेक्टरी’तील जेवण बाहेर नेऊन खाण्यास मनाई