Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढवत आहोत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी यापूर्वी 31 मार्चपर्यंत होती. आता ही मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुचनेनंतर ही मुदतवाढ देण्यात येत असल्याचे तटकरे म्हणाल्या. राज्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी शेवटची संधी देण्यात येत असल्याचेही तटकरे म्हणाल्या. यामुळे लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. Ladki Bahin Yojana आमच्यामध्ये चर्चा नव्हती Ladki Bahin Yojana अदिती तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत वडील सुनील तटकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार गटामध्ये संघटितपणे एकत्रितरित्या चर्चा झाली होती. Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; मंत्री आदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज तशी चर्चा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली नव्हती. अजितदादा असताना आणि अजितदादांच्या पश्चात विलीनीकरण या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, सुनील तटकरे यांनी हीच भूमिका घेतली होती. अजितदादांच्या अपघातानंतर लगेच या गोष्टी घडल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. ज्यावेळी विलीनीकरणाची चर्चा सुरु होती, तेव्हा कोणीही सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करुन त्यांच्या नेतृत्त्वात काम करु, असे बोलत नव्हते, असे तटकरे म्हणाल्या. Ladki Bahin Yojana