पुणे – राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे गुरुवारी पुणे भेटीवर येणार असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून या भेटीचे संयोजन केले आहे. या दौऱ्यात ते महापालिकेच्या सांडपाणी आणि कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. त्यात ते राजाराम पूल येथील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.
त्याचबरोबर वडगाव धायरी येथील दीडशे टनाच्या मिक्स कचरा प्रक्रिया प्रकल्पासह इतर कचरा प्रकल्पांनाही भेट देण्याची शक्यता आहे.