Aditya Thackeray । ‘मी शिंदे साहेबांना फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं. ते सतत लोकांमध्ये असायचे. ते आम्हाला वेळ देत नसल्याने आम्ही आधी त्यांच्याबद्दल खूप तक्रारी करायचो,’ असं बोलत असताना श्रीकांत शिंदे भावूक झाले होते. यावरून आता युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी नक्कल करत टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘तुम्ही कितीही रडारड करा मात्र तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोर ही टॅगलाईन कधीच पुसली जाणार नाही. महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातमध्ये पाठवले. तुम्ही म्हणाल की मी तेच तेच बोलत आहे. पण, एक लक्षात घ्या की आपल्याकडे येणारा वेदांत फॉक्स्ककौन आता देशात कुठेच बनणार नाहीये.’ ते पुढे म्हणाले,’या मंत्रिमंडळात एक असा मंत्री आहे ज्याने एका महिला खासदाराला शिवीगाळ केली होती. त्याला प्रमोशन देण्यात आलं. आमच्या मंत्रिमंडळात एका गद्दारावर गंभीर आरोप झाले. त्याला लगेच हकालवून लावलं. पण, जेव्हा गद्दारांचे सरकार आले आणि त्याला लगेच मंत्रिपद दिले, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. ते पुढे म्हणाले, आमदार बनवू. त्याला खासदार बनवू. पण, तरुणांचे काय..? त्यांच्या रोजगाराचे काय? परवा तलाठी भरतीचा पेपर १०० मार्कांचा. पण, मार्क किती तर १२०. त्यांना विचारलं की परीक्षा काय EVM मध्ये देत होतात काय..? पेपरफुटी इतकी वाढली आहे की पेपर फोडणाऱ्या विरोधात कायदा तीव्र करायला पाहिजे. पेपर फोडणाऱ्या लोकांना १० वर्षांची शिक्षा देण्यात यावी. आम्ही सत्तेत आलो की हा कायदा नक्की करणार असे ते म्हणाले. हेही वाचा महायुतीकडून शिर्डी लोकसभेसाठी खासदार सदाशिव लोखंडे की,बबनराव घोलप? Baramati Lok Sabha Candidate । सुप्रिया सुळे यांचे दादांना ओपन चॅलेंज, ‘तुम्ही म्हणतील ती जागा, वेळ अन् ठिकाण’