Aditya Thackeray | मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार, उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली. चेंगराचेंगरीत जखम झालेले बहुतांश प्रवाशी हे उत्तर भारतीय आहेत. हे सर्वजण छट पुजेसाठी उत्तरप्रदेशात जाण्यासाठी ट्रेन पकडत असताना आज सकाळी अपघात घडला. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Wish the reel minister was a rail minister for once. The incident at Bandra only reflects how incapable the current Railways Minister is.
The bjp has made Ashwini Vaishnav ji, a prabhari for bjp Maharashtra for elections, but every week there are some incidents and accidents…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 27, 2024
आदित्य ठाकरे काय म्हणाले ?
आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत लिहिले की, “आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला पाहिजे. सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते. भाजपने अश्विनी वैष्णव यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, परंतु दर आठवड्याला दर आठवड्याला काही ना काही घटना रेल्वे दुर्घटना आणि अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं, हे लज्जास्पद आहे.”
नेमकं काय घडलं?
वांद्रे टर्मिनसवर पहाटे पावणेतीन वाजता ही घटना घडली. वांद्रे ते गोरखपुरसाठीची 22921 अंत्योदय एक्सप्रेस फलाट क्रमांक 1 वर आल्यानंतर हा प्रकार घडला. ही गाडी स्थानकात येत येताच काही प्रवाशांनी जागा पकडण्यासाठी सामान घेऊन गाडीत चढण्यास सुरुवात केली. Aditya Thackeray |
या एक्स्प्रेस ट्रेनचे 22 डबे अनारक्षित होते. त्यामुळे या गाडीत चढण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेतील सर्व जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. Aditya Thackeray |
हेही वाचा:
‘मला निवडणूक लढवायची नाही’ ; तिकीट मिळाल्यानंतरही काँग्रेसचे उमेदवार सचिन सावंत का संतापले?